अमरावती, दि. 13 (ग्रामीण उदय प्रतिनिधी ) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे मंगळवार, दि. 16 सप्टेंबर रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
दौऱ्यानुसार, मंगळवार, दि. 16 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयातील मिशनच्या कार्यालयात उपस्थित राहतील. दुपारी 3.30 वाजता नांदगाव खंडेश्वर येथील विश्रामगृहात तालुक्यातील शेतकरी आत्महत्या व अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, तसेच शासकीय जमिनीवर चारा लागवड यासंबंधी चर्चा करतील. दुपारी 4.15 वाजता नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियास भेट देतील. त्यानंतर सोईनुसार काटोलकडे प्रयाण करतील.
0000
Post a Comment
0 Comments