एचएसआरपीसाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, August 12, 2025

एचएसआरपीसाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

अमरावती, दि. १२ (ग्रामीण उदय प्रतिनिधि): केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० अन्वये राज्यातील सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी-एचएसआरपी बसविण्याची तरतूद केली आहे. दि. १  एप्रिल २०१९  पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याची मुदतवाढ संपुष्टात येत असल्यामुळे वाहनधारकांनी नंबर प्लेट अद्यापपर्यंत बसविलेली नाही किंवा अद्यापपर्यंत बसविण्यास पूर्वनियोजित दिनांक घेतलेली नाही, अशा वाहनांवर नियमानुसार वायुवेग पथकाद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. तसेच परिवहन कार्यालातील वाहनाचे हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्र बदल करणे, वित्तदाता याचा बोझा चढविणे, उतरविणे, ना-हरकत प्रमाणपत्र जारी करणे, दृय्यम नोंदणी प्रमाणपत्र जारी करणे आदी कामे करण्यास अडचण येईल. परंतु उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बुक केल्याची पावती कार्यालयात सादर केल्यानंतरच सदर काम करण्यात येणार आहे.

वाहनधारकांनी नंबर प्लेट बसविण्यासाठी पूर्वनियोजीत दिनांक घेतलेली आहे, त्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येणार नाही, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.




Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages