Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

आमदार प्रवीण तायडे कडून माधान, शिरजगाव कसबा ढगफुटी ,अतिवृष्टी ग्रस्त, महापुराने नुकसान झालेल्या भागाची पाहणी




शिरजगाव कसबा दिनांक २१ डींगाबर सुने  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

     चांदूरबाजार तालुक्यामध्ये  १९ ऑगस्टला अतिवृष्टी महापुराने नुकसान झालेल्या भागाची पाहणी  आमदार प्रवीण तायडे यांनी महसूल पथकासोबत केली आहे.

 शिरजगाव कसबा येथे मेघा नदीचे महापुराने आठवडी बाजारातील ३६ दुकाने, धाकडे पुरा व चुनारपुरा भागातील १९ घरे व ५ जनावरे गोठ्यांचे  नुकसान झाले आहे.

मेघा नदी राज्य महामार्गावरील पूल महापुरामुळे क्षतीग्रस्त  झालेला असल्याचीही आमदारांनी पाहणी केली आहे.

आमदाराचे पाहणी दौऱ्यामध्ये  रंजना इंगळे या महिलेच्या घराची भिंत लहान मुलीचे अंगावर पडुन  जखमी झाल्याचे कळताच तात्काळ त्यांनी तहसीलदारांना  मदत करण्याचे व घरकुल बांधकाम चे निर्देश दिले आहे. 

 गावाला लागून असलेल्या मेघा नदीचे पात्रा मध्ये २ वर्ष अगोदर बंधारे बांधकाम व थुगाव रोड धाकडे पुरा पुलांमध्ये नदीचे पाणी थोपल्याने गावाचे आठवडी बाजारामध्ये व नागरिकांचे घरामध्ये नदीचे पाणी गेल्याचे नागरिकांनी आमदाराजवळ तक्रार केली आहे.

ढगफुटी अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या घरांचे , शेतकऱ्यांचे शेत पिकांचे व संत्रा उत्पादकाचे संत्रा फळे  गळण पंचनामे करावे कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी असे आदेश आमदार प्रवीण तायडे यांनी नायब तहसीलदार सोनाळकर, मंडळ अधिकारी परवेज पठाण यांना दिले आहे. पाहणी दोऱ्यामध्ये मुरली माकोडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, माजी जि प सभापती मनोहर सुने, जिल्हा सचिव नरेश बर्वे, तालुकाध्यक्ष रमेश तायवाडे, हर्षल धुळे, सरपंच प्रवीण खेरडे,जिल्हा सदस्य बाळासाहेब सोनार, गावातील संजय थेलकर, साहेबराव अस्वार, संजय कोसे,स्वप्निल पाटील ,शशांक वाठ , वसंत दाभाडे, राहुल कविटकर ,चंदन धाकडे  व गाव मौजातील सर्व तलाठी, कृषी सहाय्यक सोबत होते.


Tags

Post a Comment

0 Comments