अमरावती, दि. २१ : दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘सद्भावना दिवस’ प्रतिज्ञा दिली.
"जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची, तसेच सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गानी सोडवण्याची" प्रतिज्ञा यावेळी उपस्थितांनी घेतली. दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात येते.
यावेळी अपर आयुक्त अजय लहाने, सुरज वाघमारे, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
२१२२१
Post a Comment
0 Comments