शिरजगाव कसबा येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचा मैत्री दिनी "पत्रकार संवाद मेळावा"संपन्न
कैलास बापू देशमुख उत्कृष्ट संघटन कौशल्य मुळे "कार्य गौरव" पुरस्काराने सन्मानित.
चांदूर बाजार :-दिनांक ५ विद्या दाभाडे(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांच्या ३ ऑगस्ट मैत्री दिनी वाढदिवसा निमित्य पत्रकार व नागरीक सहकारी पतसंस्था शिरजगाव कसबा येथे पत्रकार संवाद मेळावा चे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने होते तर प्रमुख अतिथी राष्ट्रीय कार्याध्यक्ष युसूफ खान यासीन खान पठाण, राष्ट्रीय महासचिव अशोक पवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व राष्ट्रीय संघटक कैलासबापू देशमुख, केंद्रीय महिला संघटक जयश्री पंडागरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे,प्रदिप जोशी , केंद्रीय कोषाध्यक्ष अशोक यावूल, राष्ट्रीय चिटणीस प्रा. रवींद्र मेंढे, केंद्रीय विधी सल्लागार किरण भुते, केंद्रीय प्रसिद्धीप्रमुख सागर सवळे,केंद्रीय सदस्य बाळासाहेब सोरगीवकर, अरूण कुलथे,केंद्रिय कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे, पत्रकार पतसंस्था संचालक प्रदीप पंडागरे,हरिश्चंद्र पारिसे,पुजा निचत यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख यांचा"कार्य गौरव" सत्कार करण्यात आला आहे . जनसामान्यांच्या समस्या सोडवण्याकरीता प्रशासनाचा दुवा म्हणून कार्य केले तर प्रशासनावर पत्रकार संघाचा दबाव निर्माण होणार आहे . केंद्रीय कार्यकारणीचे सहकार्य असल्यामुळेच मी संघटनेची व्याप्ती वाढवू शकलो असे प्रतिपादन कैलास बापू देशमुख यांनी सत्काराला उत्तर देताना केले आहे .
या कार्यक्रमात संघटनेचे उत्कृष्ट कार्य केल्यामुळे केंद्रीय चिटणीस प्रा. रवींद्र मेंढे व केंद्रीय कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे यांचाही सत्कार करण्यात आलेला आहे.
पत्रकार सहकारी पतसंस्था ही देशातील पत्रकारांची पहिली पतसंस्था असून २५० रुपयापासून सुरू केलेल्या पतसंस्था चा आज ७५ कोटी रुपयांचा वार्षिक व्यवसाय आहे.
प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार वृत्त संकलन करताना घरावर तुळशीपत्र ठेवून कार्य करीत आहे .त्यांना शासनाचा कोणताही आधार नाही. यामुळे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने संघाचे सभासद असलेल्या पत्रकारांना अपघात विमा कवच दिलेले आहे. पत्रकार संघामध्ये आजीव सदस्य नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. तसेच संघाचे आजीव सभासद पत्रकार संजय कदम यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या २ लहान मुलीच्या नावे पत्रकार पतसंस्थांमध्ये अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने संघटना निधीमधून मुदती ठेव जमा केली असल्याची माहिती मनोहर सुने यांनी अध्यक्षीय भाषणातून दिली आहे.
अंजनगाव सुर्जी येथे पत्रकार भवन होणार असून राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांच्या वाढदिवसानिमित्त तेथे जागा मिळाली असल्याची माहिती अमरावती जिल्हाध्यक्ष सुधाकर टिपरे यांनी कार्यक्रमात दिली आहे.
यावेळी कार्यक्रमाला राजेंद्र ठाकरे राज्य सरचिटणीस ,संदीप सुने अमरावती शहर सरचिटणीस, राहुल कविटकर संपादक दिव्य क्रांती,सचिन ढोके, डॉ. राहुल अहिर,तसेच अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे, अंजनगाव सुर्जी ,तिवसा चांदूरबाजार , तसेच आकोट येथील संघाचे पदाधिकारी व केंद्रीय कार्यकारिणी पदाधिकारी व पत्रकार व नागरिक सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार पोकळे, विदर्भ शेतकरी कंपनीचे सीईओ निलेश राजस व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद कुऱ्हाडे यांनी तर संचलन व आभार प्रदर्शन अशोक याऊल केंद्रीय कोषाध्यक्ष यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments