Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन


अमरावती, दि. २७ (ग्रामीण उदय प्रतिनिधी): अमरावती-बडनेरा रेल्वे मार्गावरील रेल्वे उड्डाणपुल वाहतुकी योग्य नसल्याने यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अमरावती-बडनेरा रेल्वे मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे संरचनात्मक लेखपरिक्षण प्राप्त झाले आहे. त्यामुळे जुना आरबीओ तोडून नवीन आरबीओ बांधण्यासाठी या उड्डाणपुलावरून होणारी सर्व वाहतुक पादचारीसह बंद करण्यात आली आहे. सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सरंचनात्मक परिक्षण अहवालाआधारे सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी आवश्यक आहे.

प्रवेश बंदी सर्व प्रकारचे वाहन पादचारीसह शहरात अमरावती-बडनेरा रेल्वे मार्गावरील राजकमल चौक, हमालपूरा, जयस्तंभ चौक, रेल्वे स्टेशन चौक या मार्गाना जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपूलावरून सर्व प्रकारचे वाहनांना सदर उड्डाणपुलावरून पुढील आदेशापर्यंत प्रवेश बंदीचे आदेश देण्यात आले आहे.

त्यामुळे पर्यायी मार्ग हमालपूराकडून येणारी प्रतिबंधित वाहने बस स्टँड मार्गे रेल्वे स्टेशन मर्च्युरी टी पॉईट असे यावे. बसस्थानककडून येणारी प्रतिबंधित वाहने बस स्टॅड मार्गे रेल्वे स्टेशन मर्च्युरी टी पॉईट असे यावे. राजकमल चौक व जयस्तंभ चौक कडून येणारी प्रतिबंधित वाहने हे राजापेठ पोलिस स्टेशन समोर राजकमल चौक-जयस्तंभ चौक-मालवीय चौक या मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

सदर अधिसुचनेचे उल्ल्ंघन करणाऱ्याविरूध्द मोटार वाहन कायदा १९८८ व महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१  नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे, असे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी कळविले आहे.


Post a Comment

0 Comments