Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

मोझरी आयटीआयमध्ये प्रवेशाची पहिली समुपदेशन फेरी पूर्ण

 

अमरावती, दि. २७ (ग्रामीण उदय प्रतिनिधी): मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि. २५ ऑगस्ट रोजी पहिली केंद्रीय समुपदेशन प्रवेश फेरी पार पडली.

सदर प्रवेश फेरी करिता संस्थेचे प्राचार्य आनंद वाळके यांनी प्रवेशप्रक्रिया राबविली. तसेच संस्थेचे गटनिदेशक व शिल्प निदेशक यांनी सुद्धा प्रवेश प्रक्रियेत आपली कामगिरी उत्कृष्टरित्या बजावली.

सुरुवातीला समुपदेशन फेरीमध्ये ५९ प्रवेश निश्चित करण्यात आले. प्रवेशार्थ्यांनी न्यूनतम  व्यवसाय सोलर टेक्निशियन तथा इतर व्यवसायामध्ये प्रवेशाकरिता उत्तम प्रतिसाद दिला. केंद्रीय समुपदेशन फेरीत प्रवेश मिळालेला नसलेल्या उमेदवारांसाठी प्रवेशाची अंतिम संधी म्हणजेच संस्थास्तरीय समुपदेशन फेरी दि. २८ ऑगस्ट  ते ३१ ऑगस्टला राहील.

सदर प्रवेश फेरी करिता प्रशिक्षणार्थ्यांनी दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपासून ते दुपारी १२ वाजेपर्यंत संस्थेमध्ये येऊन हजेरी लावायची आहे. त्यानंतर ठीक दुपारी १ वाजता गुणवत्ता यादी प्रदर्शित होऊन गुणवत्ता यादीनुसारच प्रवेश दिले जातील.

प्रवेशाकरिता संस्थेमध्ये सोलर टेक्निशियन, यांत्रिक डिझेल, आरेखक यांत्रिकी, वूडवर्क टेक्निशियन, फॅशन टेक्नॉलॉजी इत्यादी व्यवसायाच्या एकूण ३८ जागा रिक्त आहेत. वरील सर्व व्यवसायाकरिता शासकीय तथा निम शासकीय व खाजगी औद्योगिक आस्थापनेमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी या संस्थेत प्रवेश घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य ए. डी. वाळके यांनी केले आहे.


Tags

Post a Comment

0 Comments