शिरजगाव कसबा दिनांक ७(डिंगाबर सुने):( ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
दि.६ ऑगस्ट रोजी सकाळी शिरजगाव मंडळ गौण खनिज पथकाने शिरजगाव कसबा येथे अवैध गौण खनिज वाहतूक करताना महिंद्रा कंपनी चे लाल रंगाचे ट्रॅक्टर/ट्रॉली (विना क्रमांकाचे) शिरजगांव कसबा येथे गावात पकडण्यात आले.व सदर कारवाई उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव अचलपूर व तहसीलदार लक्ष्मीकांत तिवारी साहेब चांदूरबाजार यांच्या मार्गदर्शनाखाली व महेंद्र गवई साहेब पोलीस स्टेशनं अधिकारी पो. स्टे. शिरजगांव कसबा यांचे सहकार्याने शिरजगाव कसबा मंडळ अधिकारी परवेज पठाण यांच्या नेतृत्वात महसूल अधिकारी संकेत घोरपडे, प्रफुल पाटील,वैभव मनवर व महसूल सेवक राजेश केंडे,अनुप गणोरकर यांनी कारवाई करून ट्रॅक्टर पोलीस स्टेशन शिरज गाव कसबा येथे लावण्यात आला.सदर ट्रॅक्टर चे चालक सुरज गंगाधर कुसराम व ट्रॅक्टर मालक प्रफुल्ल रमेशराव मेंगजे यांचे कडून वाहन जप्त करून पंचनामा कार्यवाही करण्यात आली
Post a Comment
0 Comments