Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

नांदगावपेठ येथे ग्रामपंचायतस्तरावरील आर्थिक समावेशन कार्यक्रम


अमरावती, दि. 19 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने नांदगावपेठ येथे मंगळवार, दि. 19 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतस्तरावरील आर्थिक समावेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

नांदगाव पेठ येथील संत काशीनाथ महाराज सभागृहात मंगळवार, दि. 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय निदेशक सचिन शेंडे, नांदगाव पेठचे सरपंच विनोद डांगे, जिल्हाधिकारी आशीष येरेकर, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रमुख सुनील पांडे, युनियन बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रमुख प्रमोद परहाते उपस्थित राहतील.

यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नरेंद्र हेडाऊ यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments