अमरावती, दि. 19 (ग्रामीण उदय प्रतिनिधी): अनुसूचित जमाती कल्याण समितीचा दौरा आज मंगळवार, दि. 19 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पुढील चार दिवस हा दौरा चालणार आहे. या दरम्यान समिती चिखलदरा आणि धारणी तालुक्यात दोन दिवस पाहणी दौरा करणार आहे.
अनुसूचित जमाती कल्याण समितीचा दौरा मंगळवार, दि. 19 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. शासकीय विश्रामगृहात सकाळी 9 वाजता समितीचे सदस्य एकत्र येणार आहे. त्यानंतर सकाळी 9.30 वाजता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी समवेत बैठक घेतील.
सकाळी 10 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपालिका, नगर परिषद, पोलिस विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, राज्य उत्पादन शुल्क, राज्य परिवहन महामंडळचा आढावा घेतील. त्यानंतर संत गाडगेबाबा विद्यापीठाचा विद्यापीठ येथे आढावा घेतील. जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा आढावा घेण्यात येईल. महापालिकेत महापालिका आस्थापना व शिक्षण विभाग यांचा आढावा घेतील.
बुधवार, दि. 20 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळा, वसतिगृह तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्रात विविध यंत्रणांनी राबविलेल्या कामांना भेटी देतील. गुरूवार, दि. 21 ऑगस्ट रोजी प्रकल्प कार्यालयांतर्गत धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील कामांना भेटी देतील. शुक्रवार, दि. 22 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतील.
Post a Comment
0 Comments