*इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी २७ ऑगस्ट अंतिम मुदत
अमरावती, दि.२१ (ग्रामीण उदय प्रतिनिधी ) : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना यांचा लाभ घेण्यासाठी २७ ऑगस्टपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बारावीनंतरच्या बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय वसतिगृहामध्ये अर्ज करणे अनिवार्य आहे. अर्ज hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे.
बीए, बी. कॉम, बीएससी, तसेच एमए, एमएससी अशा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. प्रवेशासाठी अर्ज करावयाची कालावधी १७ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट पर्यंत राहील. अर्जांची छाननी २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान होईल. गुणवत्तेनुसार पहिली निवड यादी ३ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. या यादीतील पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची अंतिम मुदत १२ सप्टेंबर आहे. त्यानंतर उर्वरित रिक्त जागांवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची निवड करून यादी १५ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होईल. या दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेण्याची अंतिम मुदत २३ सप्टेंबर २०२५ ठेवण्यात आली आहे.
योजनेच्या अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक गजेंद्र मालठाणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments