Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

महाडीबीटी शिष्यवृत्ती अर्ज २०२५-२६ साठी पोर्टल सुरु .


विद्यार्थ्यांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ

अमरावती, दि. २१  (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित झाले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज भरण्यास पासून सुरुवात झाली आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचे नवीन/नूतनीकरण अर्ज तसेच २०२५-२६  या शैक्षणिक वर्षाचे अर्ज भरण्यासाठी ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या योजनांमध्ये भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी योजना, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता आणि व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना यांचा समावेश आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रथम वर्षाचे आणि नूतनीकरणाचे अर्ज महाडीबीटी प्रणालीवर भरणे सुरु आहे. सर्व अर्ज शासनाच्या https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर भरण्यात यावेत.

जिल्ह्यातील सर्व पात्र विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आवाहन करण्यात येत आहे की, पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता संबंधित प्राचार्यांनी घ्यावे असे आवाहन, इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक गजेंद्र मालठाणे यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments