Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा गुरूवारी दौरा


अमरावती, दि. १३  (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे गुरूवार, दि. १४  ऑगस्ट रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

दौऱ्यानुसार, गुरूवार, दि. १४ ऑगस्ट रोजी ३ वाजता विश्रामगृह, तिवसा येथे आगमन व तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यासमवेत तालुक्यातील शेतकरी आत्महत्या व शासकीय जमिनीवर चारा लागवड यासंबंधी चर्चा करतील. दुपारी ३.३० वाजता आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियास भेट देतील. दुपारी ४.३०  वाजता प्रस्तावित शासकीय गायरान जमिनीवर चारा लागवडीच्या ठिकाणास भेट व पाहणी करतील. सायंकाळी ५.३०  वाजता सोईनुसार काटोलकडे प्रयाण करतील.


Post a Comment

0 Comments