Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

आदिवासी मुलांचे शासकीय वस्तीगृहाला भाडे तत्वावर इमारत मिळण्यासाठी प्रस्ताव आमंत्रित

 अमरावती दि. २१ :एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी अंतर्गत असलेल्या आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृहाकरीता अमरावती शहरातील १५० विद्यार्थ्यांची   निवासाची क्षमता असलेली इमारत भाडेतत्त्वावर हवी आहे.

          वसतीगृहासाठी लागणाऱ्या इमारतीमध्ये सर्व सोयी-सुविधायुक्त निवासीखोल्या, स्नानगृह, शौचालय, ग्रंथालय, संगणककक्ष, पाणीपुरवठ्याची सोय आदी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. इच्छुक असलेल्या इमारत मालकांनी आदिवासी मुलांचे शासकीय वस्तीगृह क्र. ३ (क्षमता १००० ) दस्तूर नगर, अमरावती येथे भाडे प्रस्ताव सादर करावे, असे गृहप्रमुख आदिवासी मुलांचे शासकीय वस्तीगृह क्र. ३ (क्षमता १०००) दस्तूर नगर, अमरावती यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

Tags

Post a Comment

0 Comments