Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

No title

स्वातंत्र्यदिनी वाहतूक व्यवस्थेत बदल

अमरावती, दि. 15 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : शहरात शुक्रवार, दि. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या 78 व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेतील लहान मुले, पालक, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या वाहनांची रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशावेळी वाहतुकीची कोंडी होवून अपघातासारखा अनुचित प्रकार घडू नये, तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अमरावती शहरातील सर्व हलक्या व जड वाहनांची वाहतूक नियंत्रित करण्यासाठी मुंबई पोलिस कायदा 1951 चे कलम 33 (1)(ब), तसेच मोटार वाहन कायदा 1988चे कलम 115 अन्वये शुक्रवार, दि. 15 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत शहरातील सर्व प्रकारच्या मालवाहू हलकी व जड वाहने यांना शहरात सर्व बाजूने प्रवेश बंदीचे आदेश पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी दिले आहे. तसेच शहरातील गाडगेनगर समाधीपासून ते जिल्हा स्टेडियम येथील उड्डाणपुल, इर्विन चौक ते राजापेठ पोलिस स्टेशन, तसेच कुथे हॉस्पिटल ते नंदा मार्केट आणि कुशल ऑटोकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावरुन शुक्रवार, दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत आवागमन करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदीचे आदेश देण्यात आले आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध मोटार वाहन कायदा 1988 व मुंबई पोलिस कायदा 1951 नुसार कार्यवाही करण्यात येईल, असे पोलिस उपायुक्त (मुख्यालय) रमेश धुमाळ यांनी कळविले आहे.


Tags

Post a Comment

0 Comments