Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन


अमरावती, दि. १२  (ग्रामीण उदय प्रतिनिधी): गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना राज्य स्तरावर पुरस्कार देण्याचे पर्यटन व सांस्कृतिक विभागाने जाहीर केले आहे. या गणेशोत्सव स्पर्धेत जिल्ह्यातील ग्रामीण आणि नागरी गणेशोत्सव मंडळानी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या पुरस्काराकरीता सांस्कृतिक कार्यक्रम, गायन, वादन, नृत्य, नाट्य, लोककला, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कला, हस्तकला, चित्रकला, शिल्पकला, माहितीपट, चित्रपट स्पर्धाचे आयोजन, संस्कृतीचे जतन, पोशाख संस्कृती, खाद्यसंस्कृती, वाद्यसंस्कृती, संस्कृती संवर्धनासाठी अभिनव उपक्रम, पारंपारिक नाणी, शस्त्र, भांडी संग्रहाचे प्रदर्शन, साहित्यविषयक उपक्रम, लुप्त होणाऱ्या कलाविष्कारांचे संवर्धन, तसेच राज्यातील गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय, राज्य स्मारके, धार्मिक स्थळांविषयी जनजागृती. जतन व संवर्धन आदी बाबी विचारात घेतल्या जाणार आहे.

सामाजिक उपक्रमात महिला सक्षमीकरण, पर्यावरण रक्षण, वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार व प्रसार, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक सलोखा, ज्येष्ठ नागरीक, शैक्षणिक, आरोग्य, शैक्षणिक, कृषिविषयक उपक्रम, आधुनिक तंत्रज्ञानाची जनजागृती, वंचित घटकांसाठी उपक्रम, तसेच कायमस्वरुपी सामाजिक उपक्रमात आरोग्य सेवा, ग्रंथालय, वृद्धाश्रम, गाव दत्तक घेणे, वंचित घटकांसाठी सामाजिक सेवा, तसेच पर्यावरणपुरक मूर्ती, थर्माकोल, प्लास्टीक विरहीत पर्यावरणपुरक सजावट, ध्वनीप्रदूषणरहित वातावरण, पारंपारिक देशी खेळांच्या स्पर्धा, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधेत पाणी, प्रसाधनगृह, वैद्यकीय प्रथमोपचार, वाहतुकीस अडथळा येणार नाहीत असे आयोजन, आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छता आदी बाबी पाहण्यात येणार आहे.

उपक्रमांची पूर्तता करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी विहित नमुन्यात अर्ज करावा लागणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या इमेलवर दि. २६  ऑगस्ट २०२५  पूर्वी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांनी केले आहे.


 

 

Post a Comment

0 Comments