Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रियेला १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

 

अमरावती, दि. २६ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्ग आणि आर्थिक मागास प्रर्वगातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय विभागाच्या मागासवर्गीय मुला, मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा मोफत पुरविण्यात येतात. सन २०२५-२६ साठी व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा असल्यास विद्यार्थ्यांसाठी hmas.mahait.org पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सन २०२५-२६  करिता व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन, तसेच ऑनलाईन भरलेले अर्ज पोर्टलवरुन डाऊनलोड करुन त्याची प्रिंट घेवून संबंधित वसतिगृहामध्ये ऑफलाईन अर्ज सादर करावेत.

व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशाकरीता विभागीय स्तरावरील मागासवर्गीय १ हजार  मुलांकरीता शासकीय वसतिगृह, संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह, निंभोरा, तसेच मुलींसाठी १२५ जयंती मागासवर्गीय मुलींचे नवीन विलास नगर, अमरावती तसेच तालुकास्तरावरील मुला, मुलींचे शासकीय वसतिगृह यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरु आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रम अर्ज स्विकृतीची मुदत १५ सप्टेंबर २०२५असून प्रवेशाची यादी १८ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज संबंधित वसतिगृहाकडे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 0721-2661261 यावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments