Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

सण उत्सव कालावधीत शहरात कलम ३६ लागू


अमरावती, दि. २७ (ग्रामीण उदय प्रतिनिधी): जिल्ह्यात आगामी काळात सण उत्सव साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस अधिनियमांतर्गत कलम ३६ लागू झाले आहे.

शहरात श्रीशेणशोत्सव सुरू होणार असून त्यादिवशी अमरावती कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात श्रीची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच मुस्लीम धर्मियांचा ईद-ए-मिलाद हा सण साजरा करण्यात येणार आहे.  या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३६ नुसार सर्व पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातील सर्व पोलिस ठाणेदार, अंमलदार व त्यांच्यावरील अधिकाऱ्यांना दि. २६ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२५ च्या मध्यरात्रीपर्यंत अधिकार प्रदान करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी दिले आहे.

रस्त्यावरून जाणारी मिरवणूक सुरळीत ठेवणे, उपासनास्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळ्याचा संभव असेल तर अडथळा होऊ न देणे, सर्व मिरवणूकाच्या व जमावाच्या प्रसंगी व पूजा-अर्चा या ठिकाणी कोणताही रस्ता किंवा अडथळा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा न होवू देण्यासाठी याठिकाणी बंदोबस्त ठेवणे, सर्व रस्त्यांवर किंवा रस्त्यात, सर्व धाब्यावर आणि सार्वजनिक ठिकाणच्या कपडे धुण्याचा व उतरविण्याचा जागेच्या ठिकाणी व इतर सर्व सार्वजनिक किंवा लोकांच्या येण्याच्या जागेमध्ये बंदोबस्त राहण्यासाठी, वाद्यांबाबत नियम व नियंत्रण ठेवणे, सार्वजनिक जागेत ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत नियम व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. यासाठी हे आदेश देण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments