Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा


अमरावती, 15 ( ग्रामीण उदय प्रतिनिधी) : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. श्री. भुसे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन आणि मनपा शाळेच्या कवायत संचलनाला उपस्थित राहतील.

दौऱ्यानुसार, मालेगाव येथून शासकीय वाहनाने गुरूवार, काल  दि. 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता त्यांचे अमरावती शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाले. त्यांनतर राखीव राहणार आहे.

मंत्री श्री. भुसे आज शुक्रवार, दि. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी 9.05 वाजता अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजवंदन समारंभास उपस्थित राहतील. त्‍यानंतर सकाळी 9.45 वाजता ते जेवडनगर येथील मनपा उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेतील कवायत संचलन कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सोयीनुसार मालेगावकडे प्रयाण करतील.

Post a Comment

0 Comments