*शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन
अमरावती, दि. 15 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजवंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज शुक्रवार, दि. 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9.05 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
सोहळ्यात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांनी राष्ट्रीय किंवा समारंभीय पोषाखात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने नागरिकांनी कोणतीही बॅग सोबत आणू नये, तसेच समारंभ सुरू होण्यापूर्वी 20 मिनिटे आधी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments