तिवासा तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठी सरपंच पद आरक्षित - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, July 4, 2025

तिवासा तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठी सरपंच पद आरक्षित


 

अमरावती, दि. ५ (ग्रामीण उदय प्रतिनिधी): तिवासा तालुक्यातील एकूण ४५ ग्रामपंचायतींमध्ये आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी ‘सरपंच’ पद हे महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत अधिनियम आणि शासनाच्या अधिसूचनेनुसार, १३ जून २०२५ पासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पद (महिलांसाठी) आरक्षित ठेवण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

या आरक्षण निश्चितीसाठी, मंगळवार, दि. ८ जुलै २०२५ रोजी दुपारी १२ वाजता तिवासा येथील तहसीलदार सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीद्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नामाप्र प्रवर्गातील महिला आरक्षणासह सरपंच पदांसाठी जागा जाहीर केल्या जातील.

यावेळी सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तिवसा तहसीलदार  डॉ. मंजूर कळसे यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages