जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव अभियान 1 जुलै पासून सुरू - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, July 22, 2025

जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव अभियान 1 जुलै पासून सुरू


                 अमरावती, दि. २२  (ग्रामीण उदय प्रतिनिधी ): पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर गौरव अभियान दि. १  जुलै २०२५  ते ३१ मे २०२६  पर्यंत जिल्‍ह्यात राबविण्यात येत आहे. त्‍यानुषंगाने आरोग्‍य विभागामार्फत दरमहा प्रत्‍येक आरोग्‍य संस्‍थेमध्‍ये महिलांच्‍या आरोग्‍याबाबत उपक्रम राबविण्यात येणार आहे.या उपक्रमा अंतर्गत आरोग्‍य संस्‍थानिहाय दरमहिन्‍यात शिबिराचे आयोजन करण्‍यात येणार आहे. 

पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर गौरव अभियान , महिला सक्षमीकरण यामध्‍ये महिलांसाठी एकूण ४८८  आरोग्‍य संस्‍था उपक्रम राबविणार आहेत. त्‍यामध्‍ये ५ लाख ८६ हजार २३८ महिलांना लाभ मिळणार आहे. या अभियान अंतर्गत खालीलप्रकारे शिबिर आयोजित करण्‍यात येत आहेत.

            असंसर्गजन्य आजार तपासणी व समुपदेशन अंतर्गत उच्‍चरक्‍तदाब, मधुमेह, मुखकर्करोग, स्‍तनाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, आवश्यक रक्त तपासण्या लिपिड प्रोफाइल CBC, ECG  राष्ट्रीय किशोरवयीन स्वास्थ कार्यक्रम (RKSK), राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम (RBSK) अंतर्गत किशोरवयीन मुलींना वैयक्तिक स्‍वच्‍छतेविषयी माहिती देणे, मासिक पाळीदरम्‍यानची स्‍वच्‍छता व घ्‍यावयाची काळजी याबाबत माहिती देणे, पोषण आहार, WIFS, जंतनाशक मोहिम, योगा, वात्सल्य कार्यक्रम पात्र लाभार्थ्‍यांची गर्भधारणापूर्व समूपदेशन तपासणी, उपचार याप्रमाणे तपासण्‍या करण्‍यात येतील, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages