सहकार क्षेत्रातील योगदानाबाबत पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, July 22, 2025

सहकार क्षेत्रातील योगदानाबाबत पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत


अमरावती, दि. २२  (ग्रामीण उदय प्रतिनिधी): सहकार क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्थांना त्यांचे सहकार क्षेत्रातील योगदानाबाबत पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्थांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपल्या संस्थेचे मुख्यालय असलेल्या संबंधित तालुक्यातील उपनिबंधक, सहायक निबंधक, सहकारी संस्था या कार्यालयांशी संपर्क साधून आपल्या संस्थांचे प्रस्ताव दि. ३१  जुलै २०२५  पर्यंत सादर करावेत. अडचण असल्यास उपनिबंधक, सहायक निबंधक, सहकारी संस्था व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाचे सहायक निबंधक ग. म. डावरे यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages