जिल्हास्तरावरील युवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची मुदत २४ जुलैपर्यंत - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, July 21, 2025

जिल्हास्तरावरील युवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची मुदत २४ जुलैपर्यंत

अमरावती, दि . २२  (ग्रामीण उदय प्रतिनिधी) :  राज्यस्तरीय, विभागीय आणि जिल्हास्तरीय पातळीवर विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवा पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा युवा पुरस्कार २०२४-२५ अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 जिल्हा युवा पुरस्कारासाठी जिल्ह्यातील एक युवक, एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना १०  हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

युवक युवतींसाठी पात्रता निकष व अटी पुढील प्रमाणे आहेत. अर्जदाराचे वय १ एप्रिल रोजी पंधरा वर्षे पूर्ण व ३१  मार्च रोजी २९  वर्ष पर्यंत असावे. जिल्हास्तर पुरस्कारासाठी जिल्ह्यात सलग पाच वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे .केलेल्या  कार्याचे पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेत विभागून दिला जाणार नाही .

केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

संस्थांसाठी पात्रता निकष व अटी पुढील प्रमाणे आहेत. पुरस्कार संस्थेत विभागून दिला जाणार नाही. संस्थांनी केलेल्या कार्याची पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जदार संस्था पंजीबद्ध असावी. अर्जदार संस्थेच्या सदस्यांचा पोलिस विभागाने प्रामाणिक केलेला चारित्र दाखला देणे आवश्यक राहील. युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांच्या गेल्या तीन वर्षातील कामगिरीचा यावेळी  विचार करण्यात येईल .

   इच्छुक व पात्र युवक-युवती तसेच संस्थांना करावयाचे नमुना अर्ज अर्जदारांनी २४ जुलै २०२५  पूर्वी कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती, जिल्हा क्रीडा संकुल, अमरावती मार्डी रोड, तपोवन गेट जवळ, अमरावती येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages