उर्ध्व वर्धातून खरीप सिंचनासाठी 3 पाणी पाळ्या प्रस्तावित शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, July 3, 2025

उर्ध्व वर्धातून खरीप सिंचनासाठी 3 पाणी पाळ्या प्रस्तावित शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन


        अमरावती, दि. 4  (ग्रामीण उदय प्रतिनिधी ): उर्ध्व वर्धा प्रकल्पातून खरीप हंगामासाठी पाणी साठा उपलब्ध असुन ३  पाणी पाळ्या देण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी दि. ३१  जुलै २०२५  पर्यंत संबंधित शाखा कार्यालयास अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

             उजवा मुख्य कालवा ०  ते ९५.५०  कि.मी. पर्यंत व डावा मुख्य कालव्याच्या ०  ते ४२.४०  कि.मी. पर्यंतच्या लाभक्षेत्रातील सर्व वितरीका, जलाशयावरील अधिसूचित नदी-नाल्यांवरील लाभधारकांना खरीप हंगामासाठी पाणी देण्यात येईल. वितरण व्यवस्थेद्वारे जिथे सुलभपणे पाणी जाऊ शकते तेथपर्यंत कालवा संचलन कार्यक्रमानुसार पुच्छ भागाकडून ते मुखाकडे (टेल टू हेड) या तत्त्वानुसार सिंचन होणे आवश्यक आहे. कालव्याचे प्रवाही किंवा कालव्यावरील, नदी-नाल्यांवरील मंजुर उपसा सिंचन योजनांद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी मागणी अर्ज नमुना क्रमांक ७  संबंधित शाखा कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहे. ते भरून दि.३१  जुलै पर्यंत तेथे सादर करावेत, असे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages