राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत १५ जुलैपर्यंत - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, July 10, 2025

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत १५ जुलैपर्यंत


अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय प्रतिनिधी): राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५  साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, जिल्ह्यातील शिक्षकांनी या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षण मंत्रालयाच्या https://nationalawardstoteachers.education.co या वेबपोर्टलवर १३ जुलै २०२५  पर्यंत स्व-नामांकन करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५  जुलै २०२५ पर्यंत आहे. जिल्हा परिषद, राष्ट्रीय पुरस्कार २०२५ च्या सुधारित अंमलबजावणी व वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया राबवली जात असून, शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रिया देशमुख यांनी केले आहे.

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ जुलै आहे. त्यानंतर जुलै २०२५  च्या मध्यात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून स्वतंत्र राष्ट्रीय ज्युरीची स्थापना केली जाईल. जिल्हा आणि प्रादेशिक निवड समित्यांकडून शिक्षकांची निवड प्रक्रिया १६  जुलै ते २५ जुलै २०२५ या कालावधीत पूर्ण केली जाईल आणि निवडलेली यादी ऑनलाइन पोर्टलद्वारे राज्य निवड समितीकडे पाठवली जाईल. राज्य निवड समितीकडून ही यादी २६  जुलै ते ४  ऑगस्ट २०२५  पर्यंत राष्ट्रीय ज्युरीकडे पाठवली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना (कमाल १५४ ) ५  ते ६  ऑगस्ट २०२५  रोजी व्हीसी संवादाद्वारे सूचना दिली जाईल. ज्युरीद्वारे निवड प्रक्रिया ७ ते १२ ऑगस्ट २०२५  या कालावधीत होईल आणि १३  ऑगस्ट २०२५  रोजी नावे अंतिम केली जातील. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या मान्यतेनंतर १४  ते २० ऑगस्ट २०२५  पर्यंत निवडलेल्या उमेदवारांना सूचित केले जाईल. पुरस्कार वितरण सोहळ्याची रिहर्सल आणि प्रत्यक्ष पुरस्कार वितरण ४  आणि ५  सप्टेंबर २०२५  रोजी पार पडेल. शिक्षकांनी या संधीचा लाभ घेऊन आपले शैक्षणिक क्षेत्रातील योगदान राष्ट्रीय स्तरावर पोहोचवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages