अमरावती, दि. १४ (ग्रामीण उदय प्रतिनिधी): नोंदणी व मुद्रांक विभागात गट ड संवर्गात भरती करण्यात येत आहे. यासाठी आयबीपीएसची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांनी बतावणी करणारे आणि मध्यस्थांपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई गट ड संवर्गात २८४ पदे भरतीसाठी दि. २२ एप्रिल २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरती प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्यासाठी, तसेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्यासाठी इंस्टीट्यूट ऑफ बँकीग पर्सोनेल सिलेक्शन कंपनीस नियुक्त केले आहे. त्यानुसार दि. २२ एप्रिल ते दि. १६ मे २०२५ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून देण्यात आले आहेत.
आयबीपीएसच्या संकेतस्थळावर यशस्वीरित्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची दि.१ ते ८ जुलै २०२५ या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेचे प्रवेशपत्र, हॉलतिकिट उमेदवारास त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर पाठविण्यात येणार आहे.
सदर परिक्षेसाठी विभागाकडून कोणत्याही एजन्सी आणि मध्यस्थाची नेमणूक करण्यात आली नाही. याबाबत कोणतीही व्यक्ती, संस्था, मध्यस्थ अथवा तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती किंवा संस्थेपासून उमेदवारांनी सावध राहावे, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments