Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेसाठी 28 जुनपर्यंत अर्ज करावेत


अमरावती, दि. १४  (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : जिल्हास्तरीय सुब्रोता फुटबॉल कप, सबज्युनियर मुले, ज्युनियर मुले, मुली क्रीडा स्पर्धा दि. ३  ते ५  जुलै दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा विविध वयोगटात घेण्यात येणार आहे. क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, संघांनी दि. २८  जूनपर्यंत ऑफलाईन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा क्रीडा परिषद तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि सुब्रतो मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटी मार्फत २०२५-२६  या वर्षासाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूसाठी सबज्युनियर १५ वर्षा आतील मुले क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडू दि. १  जानेवारी २०११  रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. तसेच ज्युनियर १७  मुले, मुली दि. १ जानेवारी २००९  रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सबज्युनियर, ज्युनियर क्रीडा स्पर्धेत सहभागी सर्व संघानी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागापूर्वीच subrotocup.in संकेतस्थळावर खेळाडू आणि संघांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. सहभागी होणाऱ्या संघांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ऑफलाईन नोंदणी दि. २८  जुनपर्यंत करणे आवश्यक आहे. सहभागी खेळाडूकडे जन्माचा दाखला, आधारकार्ड, खेळाडू ओळखपत्र, छायाचित्र मुळ प्रतीत असणे आवश्यक आहे.

स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा. जिल्ह्यातील शाळा, संघांनी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑफलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments