Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी घेतला मोर्शी तहसील कार्यालयातील विविध कामकाजाचा आढावा

 


             अमरावती, दि. १९  (ग्रामीण उदय प्रतिनिधी): गटविकास अधिकारी यांनी घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुल अद्यावत फोटोसह टॉपिंग याद्या तहसील कार्यालयात त्वरित सादर कराव्यात. तसेच तहसीलदार यांनी घरकुल लाभार्थ्यांना रेती वाढू वाटप करणे बाबत तातडीने रॉयल्टी देऊन त्यांना एक ब्रास प्रमाणे वाळू उपलब्ध करून द्यावी , असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी  मोर्शी तहसील कार्यालय येथे नुकतेच दिले.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी  घेतला मोर्शी तहसील कार्यालयातील  विविध कामकाजाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

             घरकुलसाठी रेती रॉयल्टी वाहतूक पास दिल्यानंतर त्यांच्या नोंदी घेणे व रेती उचल केल्यानंतर या पास लाभार्थ्यांकडून परत घेण्यात याव्यात. घरकुल रॉयल्टी कोणत्याही परिस्थितीत गैरवापर होणार नाही याची ग्राम महसूल अधिकारी यांनी दक्षता घ्यावी. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीबाबत सर्व ग्राम महसूल अधिकारी मंडळ अधिकारी यांनी पथक निहाय कारवाई करावी.

गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची महाखनिज ॲप्सद्वारे तपासणी करावी, अवैध वाहतूक आढळून आल्यास त्वरित कारवाई करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी ॲग्रीस्टॅगचा गावनिहाय आढावा घेतला. तसेच गावनिहाय पी एम किसान लाभार्थी यांची नोंदणीबाबत माहिती घेतली. यामध्ये गावनिहाय नियोजन करून तीन कॅडरमध्ये विभागणी करण्याबाबत सूचना दिल्या. तहसीलदार ,गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी नियोजन करून कृषी सेवक, ग्रामसेवक व ग्राम महसूल अधिकारी यांनी  शेतकऱ्यांपर्यंत पोहचून काम पूर्ण करून घ्यावे. ही कामे ३०  जून २०२५  पर्यंत पूर्ण करण्याबाबत सूचना  देण्यात आल्या.

 संजय गांधी श्रावण बाळ योजनेबाबत डीबीटी पोर्टलवरील कामे ३०  जूनपर्यंत पूर्ण करावे. नैसर्गिक आपत्तीविषयक घरपडझडीचे अनुदान तातडीने वाटप करावे.

  शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करावे व यादी तयार करावी. तसेच  सामायिक शेतीबाबत संमती पत्र तिथेच घेण्याबाबत ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांना निर्देश देण्यात आले.

अनुदान वाटप करताना पेन्डिग इ-केवायसीचे काम तातडीने पूर्ण करावे, असेही जिल्हाधिकारी श्री. येरेकर  यांनी सांगितले.

  मोर्शी येथील पर्यटन केद्रांला श्री. येरेकर यांनी भेट दिली. तेथे त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर नगरपरिषद अंतर्गत डंपिंग डेपो येथील कचरा व्यवस्थापन केंद्राला भेट देवून पाहण केली.


Post a Comment

0 Comments