Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशाची संधी


अमरावती, दि. १९  (ग्रामीण उदय प्रतिनिधी): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५  व्या जयंतीनिमित्त अमरावती येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात सन २०२५ -२६  या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु झाली आहे.

या वसतिगृहात इयत्ता अकरावी ते पदवी (डिग्री), डिप्लोमा आणि आयटीआयच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनी अर्ज करण्यास पात्र आहेत.

वसतिगृहात निवड झालेल्या विद्यार्थिनींना अनेक सुविधांचा लाभ मिळणार आहे. यात मोफत निवास आणि भोजन व्यवस्था याव्यतिरिक्त, विद्यार्थिनींना स्टेशनरी भत्ता, ड्रेसकोड भत्ता, शैक्षणिक सहल आणि प्रोजेक्टसाठी मदतही दिली जाईल.

प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनींकडे उत्पन्नाचा दाखला,मागील वर्षाच्या गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत, जात प्रमाणपत्र ही कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.

प्रवेश अर्ज भरण्यासाठी आणि अधिक तपशील जाणून घेण्यासाठी, विद्यार्थिनींनी सामाजिक न्याय विभागाच्या https://hmas.mahait.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या गृहप्रमुख यांनी सर्व पात्र विद्यार्थिनींना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.


  

Post a Comment

0 Comments