दि. १० (कार्यालय प्रतिनिधी_ प्रियंका केदार)
अमरावती जिल्ह्याचे वरूड तालुक्यातील पुसला येथे कायमस्वरूपी पशूवैद्यकीय अधिकारी द्या करिता.
युवा मित्र मंडळ पुसला तर्फे अनेकदा निवेदन देऊन सुद्या कुठलीच अंमलबजावणी न झाल्यामुळे आज युवा मित्र मंडळ, पुसला अध्यक्ष सुरज धर्मे यांच्या नेतृत्वात पुसला येथील पशू दवाखान्यावर तालाठोको आंदोलन छेडण्यात आले होते.
शे.घाट पोलीस स्टेशन व पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेवून लेखीस्वरुपात आंदोलकांना पत्र देण्यात आले.
त्यामध्ये असे नमूद करण्यात आले की, महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्यवे पवैद श्रेणी-२ पुसला ता. वरुड हा अपग्रेट होऊन श्रेणी-१ मध्ये झाला आहे. परंतू सदरची जागा ही एम.पी.एस.सी मार्फत होत असल्यामुळे सदरील अधिकारी उपलब्ध होईपर्यंत कायम स्वरूपी पशूवैद्यकीय अधिकारी आपल्या गावाला मिळू शकणार नाही.
तोपर्यंत हा दवाखाना अतिरिक्त कार्यभार स्वरूपात चालवावा लागेल.
परंतू पावसाळा जवळ असल्यामुळे पशुधनाची काळजी घेणे हे पशूसंवर्धन खात्याचे प्रथम कर्तव्य आहे या गोष्टीची अधिकाऱ्यांना आंदोलकांनी जाणीव करून दिले तेव्हा गावांतील दवाखाना सुरळीत सेवा मिळण्याकरिता कायमस्वरूपी परंतू अतिरिक्त कार्यभार १) डॉ पी.एम.बोबडे पशुधन विकास अधिकारी यांच्या कडे मंगळवार व शनिवार २)कु. सविता खनखने पशुसंवर्धन पर्यवेक्षक यांच्या कडे सोमवार, बुधवार, गुरुवार ३)श्री. प्रवीण शिरसाट पशुधन पर्यवेक्षक यांच्या कडे शुक्रवार असा कार्यभार दिल्यामुळे पुसला गावांतील पशुवैद्यकीय दवाखाना बंद राहणार नाही व पशुसंवर्धन संबंधित सेवा सुरळीत राहील यांची अधिकाऱ्यानी लेखी स्वरूपात ग्वाही दिले तेव्हा कुठे तालाठोको आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी युवा मित्र मंडळ, पुसला अध्यक्ष सुरज धर्मे उपाध्यक्ष जावेद शेख, धिरज सावरकर, कमलेश खपरीये,महेश ठाकरे,सुनील चिमोटे, गजानन गुल्हाने, राजू फरतोडे, आकाश गजबे,विरेंद्र सोळंकी, सागर श्रीराव, शरद वरुडकर,अंकुश कुंभारे, सागर धर्मे, अतुल ठाकरे, विजय शिरभाते, नितीन भोंडेकर,अनिल चवरे, निखिल ढोरे,निखिल श्रीराव, महेश कुहीटे, अंकित राऊत,अक्षय राऊत, गोलू तायवाडे, योगेश गजबे,फुरकान नाईक, अनिकेत कारणकर,कमलेश राऊत आदी उपस्थित होते..
Post a Comment
0 Comments