Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह येथे प्रवेशाबाबत सूचना जारी

अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय प्रतिनिधी):  

उच्च शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणारे वलगाव रोड स्थित मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह येथे सन २०२५-२६  या शैक्षणिक सत्रात एकूण ६०  विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत सूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुक व गरजू विद्यार्थ्यांनी वसतीगृहात प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहन गृहप्रमुख अनिल तसरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. प्रवेशाबाबत सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे आहे.

 वसतीगृह येथे प्रवेशासाठी विद्यार्थ्याच्या पालकाचे आर्थिक उत्पन्न २०२४-२५  मधील एक लक्ष रुपयेच्या आत असावे. तसेच अमरावती शहरातील रहिवासी विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार व सामाजिक आरक्षाणानुसार वसतीगृहात प्रवेश दिला जाईल. प्रवेशित विद्यार्थ्यांना वसतीगृहामध्ये फक्त राहण्याची व जेवण्याची मोफत सोय केल्या जाईल. अन्य कोणत्याही इतर सुविधा देण्यात येणार नाहीत.

इच्छूक व गरजू विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, वसतीगृहात प्रवेशासाठी प्रवेश अर्ज मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, वलगाव रोड, नागपूरी गेट पोलिस स्टेशन चौक अमरावती येथे २४  तास विनामूल्य देणे सुरु आहे.

प्रवेश अर्ज घेण्याकरीता विद्यालय, महाविद्यालयात प्रवेश झालयाचा पुरावा सोबत आणावा, या संधीचा गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहाचे गृहप्रमुख अनिल तसरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९५५२५५१५८४  वर संपर्क साधावा असे प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या पत्रात म्हटले आहे.




 


Post a Comment

0 Comments