तालुका पालक अधिकाऱ्यांकडून आज पहिला आढावा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, June 19, 2025

तालुका पालक अधिकाऱ्यांकडून आज पहिला आढावा



            अमरावती, दि. १९ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : तालुकास्तरावरील समस्या आणि यंत्रणांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सात तालुका पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्यानुसार नियुक्त करण्यात आलेल्या सात अधिकाऱ्यांनी आज पहिला तालुका दौरा आपल्या क्षेत्रात केला.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी स्वत: मोर्शी आणि वरूड तालुक्यात दौरा केला. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर हे मोर्शी, निवडणूक उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे दर्यापूर, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे नांदगाव खंडेश्वर, रोहयो उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर ज्ञार चिखलदरा, महसूल उपजिल्हाधिकारी विवेक जाधव अचलपूर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रध्दा उदावंत तिवसा, विशेष भुसंपादन अधिकारी प्रसन्नजित चव्हाण धामणगाव रेल्वे तालुक्यांना आज भेटी दिल्या.

जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कामकाजात गती आणण्यासाठी, स्थानिक प्रशासनाला मदत करण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी तालुका पालक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुका पालक अधिकारी यांनी आज ॲग्रीस्टॅक नोंदणी, संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजजेतील लाभ देण्यात येणाऱ्या अडचणीमध्ये ई-केवायसी करणे, नैसर्गिक आपत्तीचा पंचनामे, पीएम आवास, घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती वाटपाबाबत सविस्तर सुचना दिल्या. तसेच पीएम किसानचा लाभ देण्यासाठी ॲग्रीस्टॅक अंतर्गत नोंदणी आवश्यक आहे. ३०
जूनपर्यंत शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात यावी. नोंदणी केली नसलेल्या शेतकऱ्यांची यादी शासनास सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे या कामाला गती देण्याच्या सूचना तालुका पालक अधिकारी यांनी दिल्या.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages