त्वरित पंचनामे करुन तात्काळ अहवाल सादर करण्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, June 19, 2025

त्वरित पंचनामे करुन तात्काळ अहवाल सादर करण्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश


अमरावती, दि. १९  (ग्रामीण उदय प्रतिनिधी): जिल्ह्याचे सर्व साधारण क्षेत्र 12.21 लाख असून लागवडी लायक क्षेत्र 7.81 लाख हे. आहे. खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र 6.91 लाख हे. व रब्बी पिकाचे सरासरी क्षेत्र 1.47 लाख हे. आहे. जिल्ह्यातील खरीपाची मुख्य पिके सोयाबिन, कापूस, तूर असून रब्बीतील मुख्य पिके हरबरा व गहू आहेत. जिल्ह्यातील एकूण तालुक्यांची संख्या 14, एकूण गावांची संख्या 2016 असून 2021 च्या कृषि गणनेनुसार एकूण शेतकरी संख्या 4 लाख 56 हजार 360 आहे. त्या पैकी 1 हे. पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतक-यांची संख्या 36 टक्के, 1 ते 2 हे. क्षेत्र असलेल्या शेतक-यांची संख्या 43 टक्के, 2 हे. पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतक-यांची संख्या 21 टक्के आहे. जिल्ह्यातील सरासरी जमिन धारणा 1.64 हे. आहे.

            जिल्ह्याचे माहे जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान 145.7 मि.मी असून दि. 16 जून 2025 पर्यंत प्रत्यक्षात 44.4 मि.मी. पाऊस झाला आहे. पावसाची टक्केवारी 30.5 टक्के आहे.

 जिल्ह्यात माहे एप्रिल 2025 व मे 2025 या कालावधित नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती, फळ पिकांच्या नुकसानीसाठी 47.05 कोटी रुपये शासनाकडे मागणी करण्यात आलेली आहे.

 माहे जून महिण्यात दि. 1 जून  ते दि. 15 जून 2025 या कालावधीत वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील 94 गावातील 933.43 हेक्टर क्षेत्रावर शेती पिके, फ़ळपिकाचे नुकसानीबाबत तालुका कृषि अधिकारी अंजनगाव, धारणी, चांदूरबाजार, चिखलदरा, मोर्शी व दर्यापूर यांनी प्राथमिक अहवाल सादर केलेला असून या बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरु आहेत. बाधित क्षेत्राचे त्वरित पंचनामे करुन तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृषी व महसूल विभागाला दिले आहे.

 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages