Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

महाराष्ट्र मध्य प्रदेश ला जोडणाऱ्या पाळा खोमई मेघा नदीवरील पुलावरून आदिवासी नागरिकांचा जीवघेणा प्रवास ....



 शिरजगाव कसबा  दि. १७ (विद्या दाभाडे ग्रामीण उदय प्रतिनिधी) 

       शिरजगाव कसबा_ पाळा_ खोमई मार्गावरील महाराष्ट्र मध्य प्रदेश ला जोडणारा मेघा नदीवरील पूलवजा बंधारा १० वर्षा अगोदर आलेल्या महापुरात तुटला असल्यामुळे आदिवासी नागरिकांना या मार्गावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

सदर मेघा नदीवरील पूल वजा बंधारा महाराष्ट्रातील पाळा आदिवासी गाव व मध्य प्रदेशातील खोमई सुपाळा या आदिवासी गावाला जोडणारा आहे. या पुलवजा बंधारा ला ५० वर्षापेक्षा अधिक काळ बांधकामाला झालेले आहे. या पुलाचे बांधकामाकरिता डॉ. अनिल बोंडे राज्यसभा खासदार यांनी समाज कल्याण आयुक्तांना पत्र दिले होते त्यावर काहीच झालेले नाही. सदरच्या पुलाचे बांधकाम झाल्यास चांदूरबाजार येथून

बैतूल मध्यप्रदेश ला जाणाऱ्या प्रवाशांना १५ किलोमीटर अंतर कमी होणार आहे. हा पूल महाराष्ट्र सीमा हद्दीत येत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे माहिती घेतली असता या बांधकामाचे रेकॉर्ड त्यांच्याकडे उपलब्धच नाही या पुलाचे बांधकामाला अंदाजे १ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तुटलेल्या पुलावरून आदिवासी नागरिकांना व या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.


Tags

Post a Comment

0 Comments