अमरावती जिल्हा ग्रामीण मेळघाट अंतर्गत शिरसगाव कसबा मंडळ नागोबा संस्थान येथे संकल्प सिद्धी कार्यशाळा मेळघाट भाजप जिल्हाध्यक्ष प्रभुदास भीलावेकर माजी आमदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे.
या कार्यशाळेला अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे , प्रमुख वक्ते जयंत डेहनकर प्रदेश सचिव, ज्येष्ठ नेते अशोक बनसोड, बियाणे महामंडळाचे अध्यक्ष प्रमोद कोरडे, मदन पाटील बायस्कार , मनोहर सुने माजी जी.प. सभापती , सुखदेव पवार माजी जि. प. सदस्य ,बाळासाहेब सोनार , अक्षराताई लहाने माजी नगरसेविका,सुधीरपंत गणोस्कर , गोपाल तिरमारे, किरण सिनकर, कांतीलाल सावरकर, शिरजगाव कसबा मंडळ अध्यक्ष हर्षद धुळे, चांदूरबाजार ग्रामीण मंडळ अध्यक्ष रमेश तायवाडे, अचलपुर विधानसभा निवडणूक प्रमुख संजय थेलकर ,साहेबराव अस्वार, जयसिंग ठाकूर उपस्थित होते. या कार्यशाळेचे संचालन मिलिंद चुके यांनी केले. राजू घोटकर, दिपक गणोरकर, सागर शिरभाते, निलेश बांबळकर कार्यकर्त्यांनी यथोचित सहकार्य करून कार्यशाळा यशस्वी केली आहे.
देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात आज ११ वर्षे पूर्ण होत असून या ११ वर्षातील योजनांचा लेखाजोखा व केलेले संकल्प कार्यशाळेत मांडण्यात आले आहे.ते प्रभावीपणे जनतेपर्यंत शेवटच्या घटकाचा विकास कसा होईल हा ध्यास कार्यकर्त्यांनी करावा याचे यशस्वी नियोजन करावे.आणि देश महासत्ता होणार आहे .केंद्रापासून ते शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पंतप्रधान मोदीजींनी नेली आहे. त्याचीच यथोचित मांडणी या ठिकाणी करण्यात आली आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अभ्यासू नेतृत्वात अनेक योजना जनतेच्या विकासासाठी करण्यात आल्या आहे.एक महत्त्वकांक्षी संकल्प समृद्धी महामार्ग याच कार्यकाळात पूर्ण झाला अशा प्रकारच्या कार्यशाळा प्रथम प्रदेश नंतर जिल्हा आता मंडळ आणि यानंतर शक्ती केंद्र आणि बूथ पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यापासून बूथ अध्यक्ष आणि शेवटच्या कार्यकर्त्या पर्यंतचा हा प्रवास ही सर्वस्वी जबाबदारी कार्यकर्त्यांची असून या जबाबदार कार्यकर्त्यांमधून पुढील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद नगरपंचायत या स्वराज्य संस्थांवर यातूनच सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून जनतेमधून निवड होईल. आणि यातूनच भारतीय जनता पार्टीचा झेंडा अमरावती जिल्हा परिषदेवर फडकावा यासाठी अथक प्रयत्न करू आणि मेहनत घेऊ असा संकल्प करण्यात आला आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Post a Comment
0 Comments