अमरावती, दि. १४ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : पर्यावरण व वातावरणीय बदल, पशूसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या शनिवार, दि. १४ जून आणि रविवार, दि. १५ जून रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
दौऱ्यानुसार, शनिवार, दि.१४ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता त्यांचे अमरावती येथे आगमन होईल. त्यानंतर त्या विविध कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
रविवार, दि. १५ जून रोजी सकाळी ९.२० वाजता अंबादेवीचे दर्शन घेतील. त्यानंतर सकाळी ११.१० वाजता शासकीय विश्रामगृह येथे पशूसंवर्धन विभागाचा आढावा घेतील. त्यानंतर दुपारी १२ वाजता पर्यावरण विभागाचा आढावा घेतील. दुपारी १ वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.
Post a Comment
0 Comments