Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज 20 जुलैपर्यंत दाखल करावेत


*लोकशाहिर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे आवाहन

अमरावती, दि. १८  (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग समाज आणि तत्सम १२  पोटजातीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. यासाठी २०  जुलै पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सन २०२४-२५  या शैक्षणिक वर्षामध्ये दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी सरासरी ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे, अशा विद्यार्थ्यांना गुण क्रमांकानुसार निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. गरजू विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, गुणपत्रिका, बोनाफाईड, दोन छायाचित्र, आधार कार्ड, बँक पासबुक आदी कागदपत्रांसह दि. २०  जुलै २०२५  पर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलिस आयुक्त कार्यालयामागे, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी केले आहे.


Tags

Post a Comment

0 Comments