अमरावती दि. १८ : शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी बदल अहवाल वेळोवळी न्यास नोंदणी कार्यालयास सादर करावे. एकूण २२ प्रकारचे बदल अहवाल सादर करता येतात. बदल अहवाल रितसर वेळीच सादर केल्यास बदल अहवाल तातडीने मंजूर होईल, असे प्रतिपादन सहाय्यक धर्मदाय आयुक्त राजेश इंगोले यांनी केले.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि शासकीय विभागीय ग्रंथालयातर्फे राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्या सहाय्याने ग्रंथालयाच्या विविध योजनांविषयी दोन दिवसीय विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी अधिकृत लेखा परीक्षक नंदकुमार इंगळे, सहाय्यक ग्रंथालय संचालक डॉ. राजेश पाटील, आणि डॉ. सुरज मडावी उपस्थित होते.
अंकेक्षण अहवाल तयार करताना ग्रंथालयांनी घ्यावयाची काळजी याविषयी श्री. इंगळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी कार्यशाळेला उपस्थित ग्रंथालय चालकांच्या शंका व अडचणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रानंतर कार्यशाळेचा समारोप करण्यात आला. यावेळी उपस्थित ग्रंथालयांच्या प्रतिनिधींना प्रमाणपत्र व प्रतिष्ठानच्या योजनाविषयीच्या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. गजानन कुरवाडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजेश पाटील यांनी आभार मानले.
.jpeg)
Post a Comment
0 Comments