Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

जात प्रमाणपत्र निकाली काढण्यासाठी 26 जूनपासून विशेष मोहिम

 

अमरावती, दि. १८ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : राजर्श्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जात प्रमाणपत्र निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम दि. २६  जूनपासून राबविण्यात येणार आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

समिती स्तरावर त्रृटी पूर्तता करण्यासाठी शिबीराचे आयोजन दि. २३  जून, दि.२५ जून, दि. २  जुलै, दि. ४  जुलै २०२५ यादिवशी करण्यात आले आहे. तसेच वेबीनार. दि. २७  जून आणि दि. ३ जुलै २०२५  रोजी आयोजित करण्यात आले आहे.

राजश्री शाहू महाराज जयंती पर्वनिमित्त दि. २६  जुन ते दि. ४  जुलै २०२५  या कालावधीत जिल्ह्यातील सर्व अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थी, सीईटीमार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणारे, तसेच डिप्लोमा तृतीय वर्षामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी सदर विशेष मोहिम शिबिराचा लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांनी परिपुर्ण ऑनलाईन अर्ज समिती कार्यालयात सादर करावेत, तसेच ज्या विद्यार्थ्यांनी समितीमध्ये अर्ज सादर केला परंतु अद्यापपर्यंत वैधता प्रमाणपत्रे मिळाली नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी त्रृटी पूर्ततेच्या शिबिरात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले आहे.


 

Post a Comment

0 Comments