Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा: १०७ सुशिक्षित बेरोजगारांची प्राथमिक निवड


अमरावती, दि. २२ (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात नुकताच पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा (प्लेसमेंट ड्राईव्ह) उत्साहात पार पडला. या रोजगार मेळाव्याला उमेदवारांचा उत्स्फू़र्त प्रतिसाद मिळाला. मेळाव्यात ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा एकूण २१० उमेदवारांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी १५६ उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती दिल्या. मुलाखती दिलेल्या उमेदवारांपैकी १०७ जणांची विविध पदांवर प्राथमिक निवड करण्यात आली.

सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, राठी असोसिएटच्या संचिता राठी, भारत फायनान्सचे शुभम काकडे, कोअर प्रोजेक्टचे सचिन निचळे, स्पंदन फायनान्सच्या केयुरी देशमुख, जना फायनान्सचे अमोल भुजांडे, जाधव ग्रुप ऑफ कंपनीजचे चंद्रकांत वाघमारे आणि टेक्नोक्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेडचे किरण काळे आदी उद्योजक उपस्थित होते.

या मेळाव्यात सर्व खाजगी आस्थापनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातील पंकज कचरे, कृपा अर्गुलेवर, प्रवीण बंबोळे तसेच अधिकारी,  कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments