Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्याची संवेदनशील श्री. शिवराजसिंग चव्हाण केंद्रीय कृषिमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन मदतीचे आदेश दिले आहे.

 








ग्रामीण उदय, दिनांक १९(सौ. विद्या दाभाडे) 
महाराष्ट्रात गेले ४ दिवसापासून अवकाळी मुसळधार वादळी पावसाने थैमान घातलेले आहे. या पावसाने कांदा,उन्हाळी ज्वारी व संत्रा फळाचे नुकसान झालेले आहे. 
  अशातच शेतकऱ्याने उन्हाळी भुईमुगाच्या शेंगा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री करण्याकरिता नेल्या असता तेथे ठेवण्याकरिता शेड नसल्यामुळे शेंगाचे पोते बाजार समितीच्या पटांगणामध्ये ठेवण्यात आलेले होते, अचानक आलेल्या अवकाळी पावसाने भुईमुगाच्या शेंगा वाहून गेलेल्या आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्याने याबाबतची दखल संवेदनशील केंद्रीय कृषिमंत्री श्री शिवराज सिंग चव्हाण यांनी तात्काळ घेऊन राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सोबत चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांना मदतीचे आदेश देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी फोनवर संपर्कही केला आहे.
                                                                                                                                            








Post a Comment

0 Comments