ठिबक व तुषार सिंचन संचासाठी ९० टक्के अनुदान; महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन



 

अमरावती, दि.१४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय कृषी विकास योजना 'प्रति थेंब अधिक पीक' अंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ठिबक व तुषार सिंचन संच खरेदी करिता दिल्या जाणाऱ्या ९० टक्के अनुदान योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत-जास्त पात्र शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

 

            प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन मिशन योजना आणि बिरसा मुंडा योजना या माध्यमांतून हे अनुदान वितरित केले जाते. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकी हक्काचा ७/१२ आणि ‘८-अ’ उतारा असणे बंधनकारक आहे. संबंधित शेतकऱ्याच्या शेतात ओलिताची (पाण्याची) सोय उपलब्ध असणे आवश्यक आहे.

      

              इच्छुक लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर 'फार्मर लॉगिन' द्वारे आपला अर्ज ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे.जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी या योजनेसाठी वेळेत अर्ज करून अनुदानाचा लाभ घ्यावा, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

Previous Post Next Post

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday