*अखिल बारी समाज सर्व शाखिय महासंघ सौ. कुसुम भगत अकोला महिला जिल्हाध्यक्ष, सौ.माया धुळे अकोट तालुकाध्यक्ष, सौ. सीमा दातीर अकोट शहराध्यक्ष, सौ. अपेक्षा आवंडकर महिला ब्रिगेड अध्यक्षपदी निवड*


अकोट दिनांक 22
( ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क ) 
अखिल बारी समाज सर्व शाखिय महासंघाची बारी समाज संघटन उद्देशाने श्रीराम मंदिर संस्थान सभागृहात मनोहरराव सुने राष्ट्रीय अध्यक्षांचे अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली आहे.

सभेला प्रवीण याऊल राष्ट्रीय सदस्य, सौ.माया धुळे नगराध्यक्ष अकोट, राधेश्याम ताडे, किसनराव भोंडे,सौ.कुसुम भगत उपस्थित होते.

बारी समाज महाराष्ट्र तसेच देशातील इतर राज्यांमध्ये निवासी असून समाजाला राजकीय आधार नसल्यामुळे राजकीय व सामाजिक दृष्ट्या उपेक्षीत राहला आहे. संत शिरोमणी रुपलाल महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक चा विषय पूर्णत्वास गेलेला नाही. समाजाचे आर्थिक विकासाकरिता श्री संत रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ ला स्वतंत्र दर्जा मिळालेला नाही. यामुळे समाज संघटन होण्याच्या दृष्टीने प्रथमतः महिला सभा घेण्यात आली आहे.
*विविध महिला समित्यांची निवड*
*अकोला जिल्हा बारी समाज महिला कार्यकारणी*
सौ.कुसुम भगत -जिल्हाध्यक्ष, सौ प्रतिभा याऊल -उपाध्यक्ष, कु. प्रियंका केदार जिल्हा सरचिटणीस,कु. गायत्री भोंडे सहसचिव पदी निवड 
*अकोट शहर कार्यकारणी*
सौ.सीमा दातीर अध्यक्ष, उपाध्यक्ष सौ.नंदा दीपक केदार, सौ. हर्षा राऊत, सौ. रेखा राऊत, सरचिटणीस सौ. अर्चना आवंडकर, सहसचिव सौ.नीता धुळे 
*महिला ब्रिगेड*
अध्यक्ष -सौ. अपेक्षा आंवडकर, उपाध्यक्ष- सौ. मीरा मिसाळ 
*अकोट तालुका*
सौ.माया धुळे-अध्यक्ष, सौ. भारती नाठे -उपाध्यक्ष,सौ. शारदा योगेश नाठे सरचिटणीस 
सभेचे संचालक कु. गायत्री भोंडे आभार प्रदर्शन कु. प्रियंका केदार यांनी केले आहे. सभेला सौ. ज्योती नेमाडे ,सौ.वृषाली भगत, सौ.सीमा आंबटकर, सौ. नर्मदा बोडखे इतर बहुसंख्य बारी समाज महिलांची उपस्थिती होती.
Previous Post Next Post

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday