अमरावती NICU आग दुर्घटना: दोषींवर कठोर कारवाई आणि राज्यातील रुग्णालयांच्या 'फायर ऑडिट'साठी महिला राजसत्ता आंदोलनाचे निवेदन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, September 4, 2026

अमरावती NICU आग दुर्घटना: दोषींवर कठोर कारवाई आणि राज्यातील रुग्णालयांच्या 'फायर ऑडिट'साठी महिला राजसत्ता आंदोलनाचे निवेदन

    दिनांक : ०४-०९-२०२६                                                           

                           


                                   निवेदन


प्रति,
मा. आरोग्यमंत्री महोदय,
महाराष्ट्र राज्य, मुंबई.


मार्फत :
मा. जिल्हाधिकारी, अमरावती.

विषय : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील NICU आगीची चौकशी व राज्यातील रुग्णालयांच्या अग्निसुरक्षा तपासणीबाबत.

महोदय,

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील NICU कक्षात दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत गंभीर असून, आगीचे नेमके कारण व रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेची निष्पक्ष व तांत्रिक चौकशी होणे आवश्यक आहे.

महिला राजसत्ता आंदोलनाच्या प्रमुख मागण्या :

1. घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
2. महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयांचे Fire & Electrical Safety Audit तातडीने करावे.
3. NICU, ICU व प्रसूती विभागातील अग्निसुरक्षा यंत्रणा व विद्युत व्यवस्था तपासावी.
4. रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना अग्निसुरक्षा प्रशिक्षण व नियमित मॉक ड्रिल देण्यात यावी.
5. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी राज्यस्तरावर विशेष रुग्णालय सुरक्षा अभियान राबवावे.

तीन निष्पाप बालकांचा मृत्यू ही अत्यंत वेदनादायक घटना आहे. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासनाने तातडीने ठोस कार्यवाही करावी. मा. निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले

निवेदनकर्ते :प्रतिभा खापरे, सुनीता, राऊत, संजय खापरे, मनिष पाटील, प्रफुल्ल मंदा श्रीधर, सचिन सागर वासनिक संभाजी ब्रीग्रेड व  महा अनिस .अमरावती या संघटनाचा सहभाग होता . 
महिला राजसत्ता आंदोलन, जिल्हा अमरावती







Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages