अमरावती, दि. २४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागासाठी एकूण ६५५ जागांवर 'आपले सरकार सेवा केंद्र' वाटपाची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे.
त्यानुसार शहरी व ग्रामीण भागात एकूण ६५५ जागा उपलब्ध आहेत. अर्ज प्रक्रिया दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेपासून सुरू झाली आहे. इच्छुकांना asskamravati.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची अंतिम मुदत ही दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत असणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत केवळ ऑनलाईन पद्धतीनेच दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज सादर करायचे आहेत.
याबाबत अधिक माहिती आणि मदतीसाठी उमेदवारांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.