अचलपूरच्या नव्या एसडीपीओ म्हणून आयपीएस ईशानी आनंद यांची नियुक्ती. - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, September 3, 2026

अचलपूरच्या नव्या एसडीपीओ म्हणून आयपीएस ईशानी आनंद यांची नियुक्ती.

 


अमरावती दि. ४ :-(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

आयपीएस अधिकारी ईशानी आनंद यांची अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीतून आपले प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, महाराष्ट्र केडरच्या २०२४ च्या बॅचच्या आयपीएस (IPS) अधिकारी ईशानी आनंद यांनी नुकताच आपला अधिकृत पदभार स्वीकारला आहे

अचलपूरचे पूर्व उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार यांची पुणे येथे बदली झाली होती. त्यांच्या बदलीनंतर हे पद रिक्त होते.

 मुंबईहून थेट अचलपूर येथे झालेली ही नियुक्ती आयपीएस ईशानी आनंद यांची अधिकारी म्हणून पहिलीच स्वतंत्र पोस्टिंग (पहिले क्षेत्रिय काम) आहे. 

 शासनाच्या आदेशानुसार अचलपूर येथे रुजू होताच त्यांनी तातडीने उपविभागीय कार्यालयाची सूत्रे हाती घेत आपल्या कामाला सुरुवात केली आहे.

अमरावती ग्रामीण पोलीस दलांतर्गत येणारा अचलपूर-परतवाडा परिसर हा संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था चोख राखणे, गुन्हेगारीवर वचक निर्माण करणे आणि महिला सुरक्षेला प्राधान्य देणे यांसारखी महत्त्वाची आव्हाने नवनियुक्त एसडीपीओ ईशानी आनंद यांच्यासमोर असतील. 
 मूळच्या हरियाणाच्या असलेल्या ईशानी आनंद यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले होते.
 त्यांनी आपले अभियांत्रिकीचे (B.E.) शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर त्या पोलीस सेवेत रुजू झाल्या. 
त्यांच्या या नवीन नियुक्तीमुळे अचलपूर उपविभागातील पोलीस प्रशासनाला आणि विशेषतः महिला सुरक्षेला एक नवी गती व कणखर नेतृत्व मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages