15 ठिकाणी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ’ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, September 9, 2026

15 ठिकाणी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ’

 



 

पंतप्रधानांच्या जन्म दिनाच्या औचित्याने 29 सप्टेंबर रोजी आयोजन

 

 

अमरावती, दि. ९ (*ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क*)  :  कौशल्य ,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने 29 सप्टेंबर रोजी राज्यात 500 ठिकाणी ‘पंडित  दिनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभा’चे आयोजन करण्यात येणार आहे. याअंतर्गत अमरावती जिल्ह्यात तालुका मुख्यालयासह एकूण 15 ठिकाणी हे आयोजन होणार आहे. या मेळाव्यासाठी नोकरी इच्छुक उमेदवार आणि नियोक्त्यांसाठी ऑनलाईन  नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे.

 

            ‘युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला अनुसरून रोजगार महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत अमरावती शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि एम.आय.डी.सी. स्किल सेंटर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. वरुड येथील स्व. माणिकलालजी गांधी जागृत विद्यालय,अंजनगाव सुर्जी येथील श्रीमती राधाबाई सारडा कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,चांदूरबाजार येथील गो.सी.टोम्पे कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, अचलपूर येथील जगदंबा महाविद्यालय,चांदूर रेल्वे येथील अशोक महाविद्यालय,मोर्शी येथील भारतीय महाविद्यालय,तिसवा येथील वाय.डी.व्ही.डी. कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,चिखलदरा येथील सिपना महाविद्यालय,धारणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालय,दर्यापूर येथील जे.डी.पाटील सांगळूदकर महाविद्यालय,नांदगाव खंडेश्वर येथील विनायक महाविद्यालय,धामनगाव रेल्वे येथील श्रीराम कला महिला महाविद्यालय आणि भातकुली येथील महात्मा फुले महाविद्यालयात रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

            रोजगार संधीच्या शोधात असलेल्या व या मेळाव्यामध्ये  सहभागी होऊ इच्छिनाऱ्या  उमेदवारांना https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7  लिंकद्वारे तर या मेळाव्यात उपस्थित राहून आपल्या उद्योग समुहातील रिक्त पदावर उमेदवरांची निवड करून इच्छिणारे उद्योग समूह,एमएसएमई,आस्थापना व नियोक्त्यांनी https://forms.gle/Mrz8Gc3ofqq37wwr6  अर्ज भरुन आवश्यक माहिती अचूक व पूर्णपणे सादर करण्याचे आवाहन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून करण्यात आले आहे.


 


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages