कृष्णदीप ठाकरे यांनी पहिल्याच प्रयत्नात एसएसबी (SSB) परीक्षा उत्तीर्ण करून भारतीय सैन्यात लेफ्टनंट पद मिळवले आहे. - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, August 23, 2026

कृष्णदीप ठाकरे यांनी पहिल्याच प्रयत्नात एसएसबी (SSB) परीक्षा उत्तीर्ण करून भारतीय सैन्यात लेफ्टनंट पद मिळवले आहे.

द
                                               कृष्णदीप प्रशांत ठाकरे

🎖️ देशातील सहा विद्यार्थ्यापैकी कृष्णदिप महाराष्ट्रातून पहिला

दि. २४ शिरजगाव कसबा , अमरावती (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : अमरावती जिल्ह्यातील छोट्या गावातून सुरू झालेला प्रवास आता भारतीय सेनेतील लेफ्टनंट पदापर्यत पोहोचला आहे. चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव येथील  कृष्णदीप प्रशांत ठाकरे यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात संघ लोकसेवा आयोगाची (एसएसबी) परीक्षा यशस्वीरेत्या उत्तीर्ण करून भारतीय सेनेत लेफ्टनंट पद मिळवले आहे.

आश्वर्याची गोष्ट म्हणजे, सेनेत दाखल होण्याची इच्छा असूनही अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कृष्णदीपने केवळ 22 वर्षाच्या वयात हे यश मिळवले आहे. कृष्णदीप ठाकरे यांनी पहिल्याच प्रयत्नात कठीण मानली जाणारी एसएसबी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण जिल्हा आणि गावात अभिमानाची लाट आहे.
कृष्णदीप अभ्यासात हुशार होता त्याने ६ वाजता उठण्याची सवय लावली होती. नियमित व्यायाम, ध्यान आणि अभ्यासात यात त्याने स्वतः ला केंद्रित केले होते. कृष्णदीप यांचे हे यश सोपे नव्हते. त्यांनी आर्थिक आणि कौटुंबिक संघर्षांचा सामना केला. ते दिवसा एका ऑफिसमध्ये नियमित नोकरी करायचे.
संध्याकाळी ६ वाजता ऑफिसमधून लॉगआउट झाल्यानंतर त्यांचा खरा अभ्यास सुरू होत असे. ते दररोज रात्री उशिरा २ वाजेपर्यंत अभ्यास करत असत.
साधेपणा आणि त्यागाचे उदाहरण
 ध्येय गाठण्यासाठी त्यांनी नवीन कपडे किंवा नवीन फोन घेण्यासारख्या आपल्या वैयक्तिक इच्छा बाजूला ठेवल्या.
सोशल मीडिया, मित्र आणि फिरणे या सर्व सुख-सुविधांपासून त्यांनी स्वतःला पूर्णपणे दूर ठेवले आणि पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले.त्याची ही सातत्यपूर्ण मेहनत आणि शिस्त यशाचे गमक ठरली.

कृष्णदिप सांगतो,  "मला लहानपणापासूनच सेनेत दाखल होण्याची इच्छा  होती "देशासाठी सेवा करायची प्रेरणा मला माझ्या कुटुंबातून मिळाली. पहिल्याच प्रयत्नात यश मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला."

यश मिळवण्यासाठी त्याग करावा लागतो. काही गोष्टी सोडल्याशिवाय मोठे ध्येय गाठता येत नाही. त्याची ही साधी जीवनशैली आणि समर्पित वृत्ती आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायक ठरत आहे. त्याच्या यशामुळे गावातील तरुणांमध्येही सैन्यात जाण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी कधी नशिबाला किंवा परिस्थितीला दोष दिला नाही. ते स्वभावाने संवेदनशील, मिलनसार आहेत आणि कठीण काळातही नेहमी सकारात्मक वातावरण ठेवत असत.

गावचा अभिमान

कृष्णदीपचे हे यश केवळ त्याचे वैयक्तिक यश नाही, तर संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब आहे
त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे  त्याच्या कुटुंबीयांसह गावातील नागरिकांनी त्याचे स्वागत केले आहे. सर्व नातेवाईक, मित्र आणि परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कृष्णदीप ठाकरे यांचा प्रवास हे सिद्ध करतो की, कठोर परिश्रम, शिस्त आणि ध्येयप्राप्तीची  इच्छा असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते..




















Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages