सहा आठवडयात समस्येचे निराकरण न झालेल्या तक्रारी मांडता येणार
ख्
अमरावती, दि.३१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : अमरावती विभागातील स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तु रजिस्टर पार्सल,बचत बँक व मनीऑर्डर आदी सहा आठवडयात निराकरण न झालेल्या तक्रांरींच्या समाधानासाठी येत्या 1 सप्टेंबर रोजी प्रवर अधीक्षक डाकघर अमरावती यांच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
सहा आठवडयात निराकरण न झालेल्या व समाधानकारक उत्तर नमिळालेल्या तक्रारींची डाक अदालतीत दखल घेण्यात येणार आहे. या अदालतीत अर्ज सादर करताना तक्रारीचा सर्व तपशील, तक्रारीची तारिख, ज्या अधिकाऱ्यांना तक्रार पाठविली त्यांचे नाव व हुद्दा आदींचा उल्लेख असावा. प्रवर अधीक्षक डाकघर अमरावती-444602 या पत्त्यावर 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज पाठविण्यात यावे. वेळेत प्राप्त अर्जांचा विचार डाक अदालतील केला जाईल, असे प्रवर अधीक्ष डाकघर यांनी कळविले आहे.